विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा जीआर केला रद्द
बातमी महाराष्ट्र

विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा जीआर केला रद्द

मुंबई : मोठ्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

४ जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. त्याविरोधात तक्रार झाल्यानंतर आता गृहविभाने तो निर्णय रद्द केला असून नवा निर्णय जारी केला जाणार आहे. त्यानुसार पोलीस भरतीत एसईबीसी अतंर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस अतंर्गत भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने ४ जानेवारी रोजी काढलेला जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता नवीन जीआर काढणार आहे.