राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; ४ दिवसांत दोनवेळा ३० हजार पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; ४ दिवसांत दोनवेळा ३० हजार पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मागील ४ दिवसांत दोनवेळा कोरोनाग्रस्तांचे आकडे ३० हजार पार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यापूर्वी २१ मार्च रोजी राज्यात ३० हजार ५३५ रुग्ण सापडले होते. यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २५ लाख ६४ हजार ८८१६ इतका झाला आहे. यापैकी २ लाख ४७ हजार २९९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवरून हळूहळू घसरत ८८.२१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

वाढत्या कोरोना बाधितांसोबतच मृतांचा दररोज वाढणारा आकडा राज्यासाठी चिंतेची बाब ठरला आहे. २३ मार्च रोजी राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज हा आकडा खाली आला असला, तरी दिवसभरात तब्बल ९५ रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले आहेत. त्यामुळे आज राज्यातल्या मृतांचा एकूण आकडा ५३ हजार ६८४ इतका झाला आहे. यासोबतच राज्याचा मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर आहे.