चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे. असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.

महाराष्ट्रातील ते ९ जिल्हे खालीलप्रमाणे
१) पुणे
२) नागपूर
३) मुंबई
४) ठाणे
५) नाशिक
६) औरंगाबाद
७) नांदेड
८) जळगाव
९) अकोला