शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस
पश्चिम महाराष्ट्र बातमी

शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस

कोल्हापूर : “दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू असून तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळलं नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस आहे,” अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पाशा पटेल यांनी यावेळी शरद पवार कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते? अशी विचारणादेखील केली आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ”पाशा पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकेची तोफ डागली. “शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेत. राज्यसभेमध्ये शेतकरी कायद्यांवर चर्चा सुरू होती त्यावेळी शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते?,” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

ते पुढे म्हणाले की, “ वातावरण बदलामुळे नुकसान रोखण्यासाठी पिंपळ, वड, उंबर यासारखी पैसे आणि ऑक्सिजन मिळेल अशा झाडांची शेतकऱ्यांनी निवड केली पाहिजे. पृथ्वी संरक्षण चळवळ घेऊन मी देशभर फिरत आहे. पर्यावरणाचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुधारित इंजिनाची वाहनं वापरण्याच्या आदेशाचे स्वागत करतो.  मांजरा व गोदावरी या नदी लातूर जिल्ह्यातून वाहत असूनही येथे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी दोन्ही नदीच्या किनारी चार हजार हेक्टर क्षेत्रात वीस हजार बांबूची झाडे लावण्याचा संकल्प केला,” असल्याचं पाशा पटेल यांनी नमूद केलं.