राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ लाखांच्या घरात; ७० जणांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ लाखांच्या घरात; ७० जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेला असलेला तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आज दिवसभरात ३ हजार ७१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभारात एकूण ७० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४४ टक्के एवढा झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ८० हजार ४१६ वर पोहचली आहे. सध्या राज्यात ७४ हजार १०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १७ लाख ५७ हजार ५ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यात करोनामुळे ४८ हजार २०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख २ हजार ४५७ नमुन्यांपैकी १८ लाख ८० हजार ४१६(१६.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख १२ हजार ५८७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.