करजगी आणि आमटे कुटुंबातील वाद शीतल यांच्या शोकसभेत पुन्हा एकदा समोर
बातमी विदर्भ

करजगी आणि आमटे कुटुंबातील वाद शीतल यांच्या शोकसभेत पुन्हा एकदा समोर

नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची श्रद्धांजली सभा आज (ता. १३) पार पडली. मात्र, शीतल आमटे यांच्या शोकसभेला आमटे कुटुंबीयांपैकी एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने पुन्हा एकदा आमटे आणि करजगी कुटुंबीयांमधील वादाची किनार दिसून आली. या श्रद्धांजली सभेला आनंदवनाशी संबंधित अनेकांनी प्रत्यक्षपणे तर काहींनी झूम अॅपद्वारे आपली उपस्थिती नोंदवली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे-करजगी यांचा ३० नोव्हेंबरला आनंदवनात राहत्या घरी मृत्यू झाला. शीतलचा मृत्यू अपघाती की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत. त्यांच्या मृत्यूने आनंदवन परिवारासोबतच संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. आज रविवार १३ डिसेंबर रोजी डॉ. शीतल यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आनंदवनात एका शोकसभेचे आयोजन केले होते. दुपारी १२ वाजता आयोजित या श्रद्धांजली सभेला शीतल आमटे यांचे असंख्य चाहते उपस्थित होते. मात्र आमटे कुटुंबातील एकही व्यक्ती शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली सभेसाठी हजर राहिली नाही.

डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सासू सासरे शिरीष आणि सुहासिनी करजगी यांनी फेसबुक पोस्ट लिहून आमटे कुटुंबीयांवर आरोप केले होते. मात्र श्रद्धांजली सभेच्या वेळी हे वाद बाजूला ठेवून आमटे कुटुंबीय हजर राहतील असं वाटलं होतं. पण तसे काहीही न घडल्याने आमटे आणि करजगी कुटुंबातील वाद संपलेला नाही हेच दिसून आलं. करजगी कुटुंबाने आमटे कुटुंबीयांची गैरहजेरी आणि ती फेसबुक पोस्ट यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.