अजब ! नवऱ्याने सेक्स केला नाही म्हणून बायकोची पोलिसांत तक्रार
देश बातमी

अजब ! नवऱ्याने सेक्स केला नाही म्हणून बायकोची पोलिसांत तक्रार

अहमदाबाद : नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स केला नाही म्हणून बायकोने पोलिसांत तक्रार दिल्याची घटना अहमदाबाद शहरातील गोटा परिसरामध्ये घडली आहे. एका ३४ वर्षीय महिलेने आपल्याच पतीविरोधात पोलिसांकडे ही तक्रार केली आहे. अदालज पोलीस स्थानकामध्ये या महिलेने आपल्या दुबईत असणाऱ्या अनिवासी भारतीय म्हणजेच एनआरआय नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपल्या नवऱ्याने दोन वर्षाच्या मुलीला बियर पाजल्याचा आरोपदेखिल या महिलेने तक्रारीत केला आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षभरापासून नवऱ्याने एकदाही माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवलेले नाहीत असंही या तक्रारीमध्ये महिलेने म्हटलं आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिचं डिसेंबर २०१६ मध्ये लग्न झालं आहे. लग्नानंतर काही वर्षांनी या दोघांना मुलगी झाली. या तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे नवरा या महिलेला बळजबरीने बियर पाजायचा. आपण २०१७ साली पतीसोबत दुबईला गेलो होतो असंही या महिलेनेही तक्रारीत म्हटलं आहे.

दुबई गेल्यानंतर सासरच्या मंडळींच्या सांगण्यानुसार नवऱ्याने मला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. माझ्या तब्बेतीचं कारण देतच त्याने मागील वर्षभरापासून माझ्यासोबत शरीरसंबंधही ठेवले नव्हते, असा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल करुन घेतला असून ते या महिलेचा नवरा आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.