राज्यात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ कायम; १८६ जणांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ कायम; १८६ जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी आता परत धोका वाढताना दिसत आहे. आजही राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ कायम असून दिवसभरात ४ हजार ४५६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आज १८६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, आज दिवसभरात ४ हजार ४३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ७७ हजार २३० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात २ लाख ९० हजार ४२७ व्यक्ती होमक्कारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ०७१ व्यक्ती संस्थात्मक क्कारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१ हजार ०७८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४ लाख ६९ हजार ३३२ झाली आहे.

दरम्यान, मुंबईत आज ४१६ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ३ हजार १८७ रुग्ण उपचार घेत आहेत.