नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना इतकी भयंकर होती अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. या घटनेमध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २२ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं याबद्दलची माहिती दिल्याचं टोपे यांनी सांगितलं. याठिकाणी एकूण 23 रुग्ण व्हेंटिलेटवर होते असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना पालिका आयुक्तांनी सांगितलं, की झाकीर हुसेन रुग्णालयात 150 रुग्ण होते. यातील 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं चालत नाही. त्यामुळे, या घटनेत रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

राजेश टोपे यांनी यावेळी लसीच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत, यावरही प्रतिक्रिया दिली. टोपे म्हणाले, कोरोना लसीचा दर कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. इतर देशांमधील कोरोना लसींचे दर खूप जास्त असून भारतातील दोन्ही कंपन्यांच्या लसीचे दर कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.