एमपीएससीची तारीख ठरली! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक जारी
बातमी महाराष्ट्र

एमपीएससीची तारीख ठरली! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक जारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता परिक्षाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी परिक्षा राज्य शासनाने ९ एप्रिल रोजी पुढे ढकलली होती. दरम्यान, ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. यासंदर्भात एक परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिचाचे राहील, असे परिपत्रकात म्हटले आहे.

राज्यातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची वाट पाहत आहेत. आता परिक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.