राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुलेचा पहिला क्रमांक
बातमी महाराष्ट्र

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुलेचा पहिला क्रमांक

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तर मुलींमध्ये मानसी पाटील हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे. १३ जुलै २०१९ ते १५ जुलै २०१९ या कालावधीमध्ये राज्य लोकसेवा […]

एमपीएससीची तारीख ठरली! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक जारी
बातमी महाराष्ट्र

एमपीएससीची तारीख ठरली! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक जारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता परिक्षाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी परिक्षा राज्य शासनाने ९ एप्रिल रोजी पुढे ढकलली होती. दरम्यान, ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. यासंदर्भात एक परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले […]

११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही
पुणे बातमी

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही

पुणे : राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने गुरुवारी पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरातच ही परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर विद्य्राथ्यानी हे आंदोलन घेतले. तर आज सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘एमपीएससी’च्या परीक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले मी […]

एमपीएससी पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!
बातमी महाराष्ट्र

एमपीएससी पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

मुंबई : आज (ता. ११) दिवसभर एमपीएसीची परिक्षा रद्द झाल्याबद्दल विद्यार्थी आंदोलन करत होते, त्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एमपीएसची पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्या तारखेची घोषणा १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासून […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढाकलली एमपीएससी परीक्षा
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढाकलली एमपीएससी परीक्षा

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना करत आहे. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध […]

चला लागा अभ्यासाला! एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा
बातमी महाराष्ट्र

चला लागा अभ्यासाला! एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१चे आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च २०२१ रोजी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च २०२१ रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्याम सेवा अरजितपत्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ११ एप्रिल रोजी होणार आयोजित करण्यात आली आहे. तसेच, कोरोना […]

आता अभ्यासाला लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार
बातमी महाराष्ट्र

आता अभ्यासाला लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार

मुंबई : कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत असताना एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणी या उमेदवार करत होते. त्याची दखल घेत, आता एमपाएससीची परीक्षा लवकरच घेतली जाणार असल्याचे सांगितले […]