Bhagatsinh Koshyari Resign : ब्रेकिंग न्यूज! महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर दिला राजीनामा
महाराष्ट्र

Bhagatsinh Koshyari Resign : ब्रेकिंग न्यूज! महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर दिला राजीनामा

Bhagatsinh Koshyari Resign : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. अखेर हा राजीनामा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. राष्ट्रपती भवनाने याबाबत माहिती दिली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडले आहेत. दरम्यान, विरोधकांनीही राज्यपालांवर टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 13 राज्यांचे राज्यपालही बदलले आहेत.

लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक यांची रुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी, सीपी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी, गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी, शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्रात अनेकदा असंतोष निर्माण झाला आहे. युवराज संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले, शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामाही केंद्राला स्वीकारावा लागला. या पार्श्‍वभूमीवर कोशियारी यांनीच पेच टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. हा राजीनामा आता मंजूर करण्यात आला आहे.