राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमालीची घट; तर कोरोनामुक्तांचा आकडा १७ लाखांच्या वर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमालीची घट; तर कोरोनामुक्तांचा आकडा १७ लाखांच्या वर

मुंबई : ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे ब्रिटनच्या शेजारील आणि युरोपीयन देश सतर्क झाले असले तरी महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसत आहे. आज राज्यात २ हजार ८३४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, राज्यात आज ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा आज घडीला २.५७ टक्के इतका आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर आज राज्यात ६ हजार ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ८९ हजार ९५८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.२४ टक्के झाला आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २१ लाख ५७ हजार ९५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ९९ हजार ३५२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ९३८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ५७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५९ हजार ४६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात २ हजार ८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ९९ हजार ३५२ इतकी झाली आहे.