सलमान खान खतरनाक; मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकचा टिझर रिलीज
मनोरंजन

सलमान खान खतरनाक; मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकचा टिझर रिलीज

मुंबई : मराठीमधील हिट चित्रपट मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक येत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सलमान खान चित्रपटात मूख्य भूमिकेत असून चित्रपटाची निर्मीतीही सलमान खाननेच केली आहे. अंतिम: द फाइनल ट्रुथ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने होते. दोघेही या सीनमध्ये शर्टलेस दिसत आहेत. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अंतिम: द फाइनल ट्रुथ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अंतिम: द फाइनल ट्रुथ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सलमानने नुकताच राधेः योर मोस्ट वांटेड भाई या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. हा चित्रपट यंदा प्रदर्शित होणार होता पण कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता सलमानने चित्रपटाचे उर्वरित शूटिंग पूर्ण केले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. त्यानंतर सलमानने अंतिम: द फाइनल ट्रुथच्या चित्रीकरणास सुरूवात केली आहे.