राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर; आज ३ हजार ९४९ जणांना डिस्चार्ज
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर; आज ३ हजार ९४९ जणांना डिस्चार्ज

मुंबई : कोरोनाचा धोका टळला नसला तरी तो काही प्रमाणात कमी झाल्याचे आता समोर येत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर पोहोचला असून मागील २४ तासांत एकूण ३ हजार ९४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार २५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज दिवसभरात एकूण ८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याचबरोबर आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १८ लाख ७६ हजार ६९९वर पोहचली आहे. सध्या राज्यात ७३ हजार ५४२ अॅक्टिव्ह केसेस असून, १७ लाख ५३ हजार ९२२ जण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत राज्यात ४८ हजार १३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ नमुन्यांपैकी १८ लाख ७६ हजार ६९९(१६.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

दरम्यान, करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे प्राण गमावले आहेत. जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.