कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केरळमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत मिळणार असल्याची मोठी घोषणा केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज (ता. १२) केली आहे. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा कोरोनावरील लस आली की ती राज्यातील नागरिकांना मोफत दिली जाईल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यानंतर मध्यप्रदेशकडून देखील ऑक्टोबरच्या शेवटी अशाच प्रकारची घोषणा केली गेली. देशात कोरोनावरील लस निर्मितीचे कार्य जोरात सुरू आहे. जेव्हा ही लस तयार होईल. तेव्हा मध्यप्रदेशमधील प्रत्येक नागरिकास ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल. असं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विटद्वारे जाहीर केलं होतं.

केरळमध्ये आज दिवसभरात ५ हजार ९४९ नवे करोनाबाधित आढळले. तर, मागील २४ तासांमध्ये ५९ हजार ६९० नमूने तपासले गेले. याशिवाय ५ हजार २६८ जण करोनातून बरे झाल्याचेही सांगण्यात आले. केरळमधील करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता ६ लाख १ हजार ८६१ झाली आहे. तर, सध्या ६० हजार २९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे प्राण गमावले आहेत. जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.