कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; पाहा २४ तासांतील आकडेवारी
क्रीडा बातमी

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; पाहा २४ तासांतील आकडेवारी

मुंबई : कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार ७८७ नवे कोरोनाबाधितवाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३८ हजार १३ असून, आजपर्यंत कोरोनामुळे ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.६२ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आजपर्यंत १५ कोटी ४३लाख ५५ हजार २६८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २० लाख ७६ हजार ९३ नमूने (१३.४३टक्के)पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ जण गृह विलगीकरणात असुन, १ हजार ६६४ जण संस्थात्कमक विलगीकरणात आहेत.