आजही राज्यात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

आजही राज्यात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आजही ५ हजारापेक्षा जास्त नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात ५ हजार २२९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासात १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, दिवसभरात ६ हजार ७७६ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ लाख १० हजार ५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.८१ टक्के इतका झाला आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ११ लाख ३२ हजार २३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४२ हजार ५८७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ५०४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८३ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात ५ हजार २२९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ४२ हजार ५८७ इतकी झाली आहे.