धक्कादायक! मंत्रालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
बातमी मुंबई

धक्कादायक! मंत्रालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्यसरकारने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना लागू केल्या असून पुढील आठ दिवसात परिस्थिती पाहुन लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

असे असतानाच एक धक्कादायक बाब पुढे आल आहे. राज्यातील ठाकरे सरकारमधील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मंत्रालयाच्या महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. एकाच विभागातील इतके कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती क्वारंटाईन झाले आहेत. तसेच महसूल विभागात सॅनिटायझेशनही करण्यात येण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोनाने विळखा घातला आहे. महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. तर 10 राज्यमंत्र्यांपैकी 7 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे सरकारमधील 43 पैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवाने यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे तर काहीजण अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.