मृतांचा आकडा वाढला तरी राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची घटली संख्या
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मृतांचा आकडा वाढला तरी राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची घटली संख्या

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या स्थिरावून ती काहीशी घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार २६९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच आज एकूण ७ हजार ३३२ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण २२४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजच्या २२४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २९ हजार ८१७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६६ लाख ४४ हजार ४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ५८ हजार ०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २७ हजार ७५४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.