समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात; १२ जणांचा मृत्यू
बातमी विदर्भ

समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात; १२ जणांचा मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिंदखेडराजा तालुक्यातील तडेगावमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला डंपरवरुन १६ मजूर प्रवास करत होते. समोरुन येणाऱ्या बसला रस्ता देण्यासाठी डंपरचालकाने तो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तो पलटला आणि मोठा अपघात घडला.

हा अपघात इतका भीषण होता की डंपरमधील सळई मजुरांच्या अंगात आणि पाठीमध्ये घुसल्या आहेत. त्यामुळेच घटना स्थळीच १२ मजूरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.