कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्या म्हणून वृद्धाची आत्महत्या
बातमी मुंबई

कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्या म्हणून वृद्धाची आत्महत्या

विरार : कुत्र्याने कोंबड्या खाल्या म्हणून वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका ६० वर्षीय वयोवृद्धाने केवळ घरातील कोंबड्या कुत्र्यांनी खाल्ल्या म्हणून तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या संदर्भात नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नालासोपारा पश्चिम येथील गास गावात राहणारे थॉमस रूमव (६०) हे टाळेबंदीच्या अगोदर वाद्य वाचविण्याचे काम करत होते. पण करोना काळात हा व्यवसाय बंद झाल्याने ते बेरोजगार झाले. त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी २३ कोंबड्या घेतल्या होत्या.

तीन दिवसांपूर्वी रात्री कुत्र्याने त्यांच्या सर्व कोंबड्या खाऊन टाकल्या. २९ जानेवारी रोजी अचानक घरातून कुठेतरी ते निघून गेले. मुलाने या संदर्भात तक्रारसुद्धा केली होती. घराजवळील तलावाजवळ एक चप्पल आढळून आली. त्यावरून त्यांचा शोध लागला, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक भोये यांनी दिली.