चक्क डोक्यात अन् अंडरविअरमध्ये लपवलं सोनं; व्हिडिओ पाहाच
देश बातमी

चक्क डोक्यात अन् अंडरविअरमध्ये लपवलं सोनं; व्हिडिओ पाहाच

चेन्नई : तामिळनाडूत एक चोरी पकडली गेली असून चेन्नई विमानतळावर मोठ्या प्रमाणावर सोनं जप्त करण्यात आलं आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी जो प्रयत्न केला गेला तो पाहून कस्टम अधिकारीही चक्रावून गेल्याचे पाहायला मिळाले. डोक्यावर केसांच्या शिवलेल्या विगचा सोने तस्करीसाठी वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हे सोनं डोक्यावर जेथे विग चिटकवला जातो त्याच्याखाली चिटकवलं होतं, पण तरीही कस्टमने हे शोधून काढलं आहे, याचा व्हीडिओ देखील त्यांनी ट्विटरवर ट्विट केला आहे. एवढंच नाही तर तस्करांनी अंडरविअरमध्येही सोनं लपवलेलं होतं.

चेन्नईत सुमारे अडीच कोटी रुपयांचं ५.५५ किलो सोनं कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलं आहे. खाडी देशातून हे सोनं भारतात तस्करी करण्याचा हा प्रयत्न होता. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.