वंशाच्या दिव्यासाठी विझवली पणती; पवारांच्या काटेवाडीत आईनेच केला सव्वा महिन्याच्या मुलीचा खून
पुणे बातमी

वंशाच्या दिव्यासाठी विझवली पणती; पवारांच्या काटेवाडीत आईनेच केला सव्वा महिन्याच्या मुलीचा खून

बारामती : तिसरी ही मुलगी झाल्याचा नैराश्यातून आईने सव्वा महिन्याच्या मुलीचा खून केल्याची घटना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या काटेवाडी गावात घडली आहे. या घटनेने बारामती तालुक्यात खळबळ उडाली होती. बारामती तालुका पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केल्यानंतर हा खून आईनेच केला असल्याचे निष्पन्न झालं आहे. आई दिपाली संदीप झगडे हिला आज (ता. २९) पोलिसांनी अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत सविस्तर माहिती अशी की दिपाली संदीप झगडे ही काटेवाडी ता. बारामती येथील विवाहिता ही बाळंतपणासाठी चंदननगर, माळेगाव येथे वडिल संदीप जाधव यांच्या घरी आली होती. सव्वा महिन्याची राधा हिला पाळण्यात झोपवले होते. झोपेतून उठल्यावर पाहिले असता. राधा पाळण्यात दिसली नाही म्हणून तिने शोधाशोध केली. मुलगी मिळून आली नाही म्हणून मुलीचे आजोबा संजय जाधव यांनी माळेगाव दूरक्षेत्रात खबर दिली. घराजवळील पाण्याच्या टाकीत तिचा मृतदेह मिळून आला होता. या लहान बाळाच्या खुनाचा आरोपी गजाआड करण्यासाठी पोलिसांची कसून चौकशी चालू आहे. यात अनेकांची चौकशी केल्यानंतर संशयाची सुई मुलीच्या आईकडे वळली होती. चौकशी नंतर या मुलीच्या आईनेच तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पाहिल्या दोन मुली होत्या. आता मुलगा हवा यामुळे ती नैराश्यात गेली होती. यातूनच तिने या मुलीला पाण्याच्या टाकीत टाकले होते. दोन मुली असताना तिसरी ही मुलगी झाल्यापासून ती नैराश्यात होती. या नैराश्यातून तिने या राधिकाचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले.