म्यानमारमध्ये रक्तपात; दिवसात ११४हून अधिक लोक ठार
बातमी विदेश

म्यानमारमध्ये रक्तपात; दिवसात ११४हून अधिक लोक ठार

म्यानमार : म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला असून लष्कराने एका दिवसात ११४ हून अधिक जणांना ठार केले आहे त्यामुळे शनिवार हा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला. गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडानंतर, शांततेत निदर्शने करणाऱ्यांवर लष्कराच्या जवानांनी शनिवारी मोठी कारवाई केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंडखोरीनंतर देशभरातील ४४ शहरांत रक्तपात करण्यात आला. निदर्शकांच्या डोक्यावर आणि पाठीवर गोळ्या घालण्यात आल्या आहेत. १ फेब्रुवारीला म्यानमारच्या सैन्याने नागरी सरकार उलथून टाकले आणि राज्य सल्लागार आंग सॅन सू की यांच्यासह नागरी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यासोबतच वर्षभराची आपत्कालीन स्थिती जाहीर केली. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि म्यानमारमधील यूएनच्या कार्यालयाने या हिंसाचाराविरोधात खेद व्यक्त केला आहे.

सैन्यदलाविरूद्ध गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या शांततामय निदर्शकांवर लष्कराच्या तीव्र कारवाईचा परिणाम आज झाला आहे. या घटनेचा त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. युएन सरचिटणीसचे उप-प्रवक्ते फरहान हक यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हक म्हणाले की, गुटेरेस यांनी नागरिकांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. म्यानमारमधील संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे की, देशभरात सैन्य दलाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारल्याचे कृत्य खरंच निंदनीय आहे, आज झालेली अनावश्यक हानी भयानक आहे.