महाराष्ट्र हादरला ! भर चौकात महिलेला जिवंत जाळले
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला ! भर चौकात महिलेला जिवंत जाळले

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना नागपूरातील अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेजजवळील हल्दिरामसमोर घडली आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिलेला भर चौकात जिवंत जाळण्यात आले. भर चौकात घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शबाना अब्दुल जावेद (वय ४० रा. महेंद्रनगर), असे मृतकाचे नाव आहे. शबाना या अजनीतील टाटा मोटर्स येथे काम करीत होत्या. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून काम आटोपून शबाना या मोपेडने घरी जात होत्या. सदरमधील हल्दिरामसमोर एका तरुणीसोबत तरुण वाद घालत असल्याचे शबाना यांना दिसले. त्यांनी मोपेड थांबवली. त्या तरुणाला समाजविण्यासाठी गेल्या. समजावित असतानाच तरुण संतापला. त्याने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकले. माचिसची काडी उगारून त्यांच्या अंगावर फेकली. त्यानंतर तरुण तरुणीला घेऊन मोटरसायकलने पसार झाला.

शबाना यांना जळताना बघून नागरिकांनी धाव घेतली. पाणी टाकून आग विझवली. नागरिकांनी शबाना यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.