अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी केली चूक; सभागृहात हशा पिकला
देश बातमी

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी केली चूक; सभागृहात हशा पिकला

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सात लाखाचे उत्पन्न करमुक्त करण्यासोबत त्यांनी अनेक घोषणा केल्या. यात वाहनांबाबतच्या धोरणांचा समावेश होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निर्मला सीतारामन यांनी वाहनांच्या धोरणावर बोलताना एक चूक केली. ही चूक सभागृहात उपस्थीत असलेल्या सदस्यांच्या लक्षात आली आणि त्यांना हसू आवरता आले नाही. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील होते. सभागृहातील हशा सीतारामन यांना लक्षात आला आणि त्यांनी चूक लगेच दुरुस्त केली.

वाहन धोरणावर बोलताना सीतारामन यांनी ओल्ड पॉलिटिकल व्हेईकल असा शब्द वापरला. त्याच बरोबर सभागृहात एकच हशा पिकला. सीतारामन यांच्या देखील ही चूक लक्षात आली आणि त्यांनी सॉरी म्हणत चूक दुरुस्त केली. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी ओल्ड पोल्युटेड व्हेईकल असा बरोबर शब्द उच्चारला. सॉरी मला माहिती आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, असे सीतारामन म्हणाल्या.