७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट कशी मिळवायची? काय करावे लागणार?
देश बातमी

७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट कशी मिळवायची? काय करावे लागणार?

पगारदार किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला ठराविक उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असेल तर आयकर भरावा लागतो. जर तुम्ही ७ लाख रुपयांपर्यंत कमावत असाल तर तुमच्यासाठी आयकरात सवलत आहे. हे नियम अगदी सोपे असले तरीही यामध्ये अनेकांचा गोंधळ होतो. यामुळे आधी इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे काय आणि कोणत्या लोकांना त्याचा फायदा मिळतो हे जाणून घ्या. जर तुमचे उत्पन्न ७ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 87A अंतर्गत ही सवलत मिळणार नाही. याचा स्पष्ट अर्थ प्रत्येकाला ही सवलत मिळत नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे काय?

कर सवलत म्हणजे सरकारद्वारे माफ केलेले कर. नियमानुसार, जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपयांपर्यंत असेल. तर त्याचे आयकर दायित्व माफ होते. या निर्णयामुळे वार्षिक ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. कारण या उत्पन्न मर्यादेवरील कर सवलतीच्या श्रेणीत येतो. त्यामुळे सरकार त्याला माफ करते.

कोणाला कर सवलत मिळते?

वास्तविक हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) या सवलतीचा लाभ घेऊ शकत नाही. तसेच, सवलतीचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही आयकर कायद्यानुसार रहिवासी असणे आवश्यक आहे. कारण, अनिवासींनाही त्याचा लाभ मिळत नाही. याशिवाय तुमचे करपात्र उत्पन्न ७ लाखांपेक्षा जास्त नसावे.

७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट कशी मिळवायची?
समजा ३ ते ६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स स्लॅब असेल तर 5 लाखांच्या करपात्र उत्पन्नावर १२ हजार ५०० रुपये आयकर द्यावा लागेल. परंतु तुम्ही विविध प्रकारच्या बचत योजना व सवलतींचा लाभ घेतला तर हा कर माफ होतो.