मोठी बातमी! नीट परीक्षेचा पेपर लीक; ८ जणांना अटक
देश बातमी

मोठी बातमी! नीट परीक्षेचा पेपर लीक; ८ जणांना अटक

जयपूर : नीट परीक्षा २०२१चा पेपर जयपूरमध्ये लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रविवारी १२ सप्टेंबर रोजी हे प्रकरण समोर आलं आहे. जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर सकाळी २ वाजता सुरू झाला आणि पेपर २.३० वाजता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लीक झाला. या संपूर्ण प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी उमेदवार धनेश्वरी यादवची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर इतरांना रिमांडवर घेण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोचिंग संचालक नवरत्न स्वामी हे जयपूरमधील या पेपर लीकच्या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नीटच्या पेपर लीकचा हा व्यवहार ३५ लाख रुपयांमध्ये झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पेपर जयपूर येथील राजस्थान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी नीट परीक्षा केंद्रातून लीक झाला आहे.

देशभरातील ३ हजार ८००हून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या वर्षी नीट परीक्षेसाठी १६.१४ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. नीट युजी परीक्षा प्रथमच १३ भाषांमध्ये घेण्यात आली आहे.