२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तान न्यायालयाकडून 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
बातमी विदेश

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तान न्यायालयाकडून 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

इस्लामबाद : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तानच्या न्यायालयाने 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानी दहशतवाद विरोधी न्यायालयाने टेरर फायनान्सिंगच्या प्रकरणात या जागतिक दहशतवाद्यावर 200,000 पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणात हाफिज सईदला याआधीच 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी लाहोरच्या दहशतवादविरोधी कोर्टाने जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईदसह प्रमुख पाच जणांना आणखी एका प्रकरणात दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी १५ वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. हाफिजला सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागणार आहेत. हाफिजसह हाफिज अब्दुस सलाम, जफर इकबाल, याह्या मुजाहिद आणि मोहम्मद अशरफ यांचा समावेश आहे.

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईद मुख्य आरोपी आहे. हाफिज सईद भारताला हवा आहे. हाफिज सईद याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले असून त्याच्यावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर संयुक्त राष्ट्र संघाद्वारे हाफिजला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर, पाकिस्तानला फेब्रुवारीत होणाऱ्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (FATF) बैठकीत ग्रे लिस्टमधून बाहेर यायचं आहे. म्हणूनच पाकिस्तान हा दिखावूपणा करत आहे की त्यांनी दहशतवादाविरोधात पाऊल उचललं आहे.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये झालेल्या FATF च्या बैठकीत देखील पाकिस्तानवर दहशतवादाविरोधात काम न केल्यामुळे ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यावर सहमती झाली होती. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, कोर्टाच्या या शिक्षेचा सईदवर काहीही फरक पडणार नाहीये. त्याला लवकरच नजरकैदेत ठेवण्यात येईल तसेच त्याला त्याची संपत्तीही परत करण्यात येईल.

दरम्यान, अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लची हत्या करणारा दहशतवादी अहमद उमर शेख, फहाद नसीम, सईद सलमान साकिब आणि शेख मोहम्मद आदिल या दहशतवाद्यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश सिंध हायकोर्टाने दिले आहेत. डॅनियल पर्ल हत्याकांड प्रकरणाची सुनावणी करताना सिंध हायकोर्टाने हे आदेश दिले. वर्ष १९९९ मध्ये एअर इंडिया विमान अपहरणानंतर भारताने उमर शेख या दहशतवाद्याची सुटका केली होती.