कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीचीच नाहीत – संभाजी भिडे
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीचीच नाहीत – संभाजी भिडे

सांगली : कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीचीच नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. मुळात करोना हा रोग नाही. हा रोग ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही, असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही, असंही त्यांनी म्हटले आहे. भिडे सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भिडे पुढे म्हणाले, मी काही राजकीय माणूस नाही. पण माझ्यासारखी असंख्य लोक संपूर्ण देशात अस्वस्थ आहेत. हा मूर्खपणा सुरु आहे. करोना हा रोगच नाही. हा मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही, असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. कोरोनाच्या नावाखाली खेळखंडोबा सुरु आहे. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का?, अशी विचारणा संभाजी भिडे यांनी केली. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील, असंही ते म्हणाले.

कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद. करोना अस्तित्वात नाही. लॉकडाउनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे, असंही ते म्हणाले.