धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा होणार लवकरच साखरपुडा
क्रीडा

धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा होणार लवकरच साखरपुडा

मुंबई : अभिनेत्री राय लक्ष्मी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. राय लक्ष्मी क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीची एक्स गर्लफ्रेंड होती. आता राय लक्ष्मी मागचं सगळं विसरून नव्या आयुष्याची सुरूवात करणार आहे. ती तिच्या पार्टनरसोबत साखरपुडा करणार आहे. तिच्या साखरपुड्याची तारीख देखील सोशल मीडियावर जाहीर केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘गेल्या अनेक दिवसांपासून लोक मला एक प्रश्न विचारत आहेत. आता मी त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. मला असे वाटते की माझ्या आयुष्यात काय घडत आहे, यात कोणालाही अधिक रस नाही. फार कमी लोकांच्या उपस्थितीत मी साखरपुडा करत आहे. सगळं काही अतिशय घाईत होत आहे. पण माझं कुटुंब आणि मी फार आनंदी आहोत. मी त्या व्यक्तीची होण्यासाठी तयार आहे, ज्याच्या सोबत मला पूर्ण आयुष्य जगायचं आहे.’ असं राय लक्ष्मीने म्हटलं आहे.

महेन्द्र सिंह धोनीच्या करियरच्या सुरूवातीला त्याचं नाव अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत जोडलं गेलं होतं. पण त्यांचं नात तुटण्यामागचं कारण अद्याप कळू ळकलेलं नाही. एका मुलाखतीत राय लक्ष्मीने धोनीसोबतच्या नात्याला एक चूक म्हणून सांगितलं होतं.