plane crash : हवाई अपघात: भारतीय हवाई दलाची 3 लढाऊ विमाने कोसळली
देश बातमी

plane crash : हवाई अपघात: भारतीय हवाई दलाची 3 लढाऊ विमाने कोसळली

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. भरतपूरमध्ये एक जेट फायटर कोसळले. मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-३० आणि मिराज २००० विमान कोसळले. एकाच वेळी तीन लढाऊ विमाने कोसळल्याने खळबळ उडाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजस्थानमध्ये आज सकाळी भरतपूरमधील सेवर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक लढाऊ विमान कोसळले. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर त्याला आग लागली. विमानाचे तुकडे झाले. सुदैवाने हे विमान गावातील एका शेतात कोसळले. जीवितहानी झाली नाही. दुसरी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. सुखोई ३० आणि मिराज २००० विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले. हवाई दलाचे सराव सुरू आहेत. मात्र अचानक दोन्ही विमानांची टक्कर झाली. त्यामुळे हा अपघात झाला. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सुखोईमध्ये 2 पायलट आणि मिराजमध्ये 1 पायलट आहे.

दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. तिसऱ्या पायलटला घेण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर निघाले होते. मुरैना जिल्ह्यातील पहागड विकास भागात एक लढाऊ विमान जंगलात कोसळले. लोकांनी आकाशात विमाने जळताना पाहिली. त्यानंतर विमान कोसळले. अपघात झालेल्या दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी त्यांची विमाने मोकळ्या मैदानात उतरवली. घटनास्थळी बचावकर्ते दाखल झाले आहेत.