शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही
देश बातमी

शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

नवी दिल्ली : दिल्लीतून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. आग लागल्याचे लागल्याचे लक्षात येताच एक्सप्रेसच्या लोको पायलटने ट्रेन थांबवत आग लागलेले कोचमधून प्रवाश्यांना बाहेर काढत कोच ट्रेनपासून वेगळे केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. आगीची माहिती मिळताच एडीआरएन एन.एन. सिंह आणि अन्य रेल्वेचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोगोचले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नवी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या सी ४ या कोचला आग लागली होती. या कोचमध्ये जवळपास ३० प्रवासी प्रवास करत होते. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. या कोचमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहे. तसंच त्यांना अन्य कोचमध्ये हवण्यात आलं. यानंतर ट्रेन पुन्हा देहरादूनसाठी रवाना करण्यात आलं. घटनेचं गांभीर्य पाहता देहरादून रेल्वे स्थानकावर अॅम्ब्युलन्सही पाठवण्यात आल्या आहे.

या कोचमध्ये तसंच ही राजाजी टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी वन विभागाची चौकीदेखील होती. दरम्यान, या घटनेचा आता पुढील तपास केला जात असून कोणत्या कारणामुळे ही आग लागली याची माहिती घेतली जात आहे. तर, ही घटना कंसारो घाटाजवळ घडली, शॉर्ट सर्किट हे दिल्ली-देहरादून एक्स्प्रेस ट्रेनमागील कारण होते. रेल्वेचे अधिकारी आणि जीआरपी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणून ट्रेन देहरादूनला तीन वाजून सात मिनिटांनी पोहोचली असल्याची माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.