राम गोपाल वर्मा म्हणतो, ‘मला महिलांच शरीर आवडतं; डोकं नाही’
मनोरंजन

राम गोपाल वर्मा म्हणतो, ‘मला महिलांच शरीर आवडतं; डोकं नाही’

मुंबई : लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्यामुळे अनेकदा वादही झाला आहे. रामगोपाल वर्मा आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य त्याने केले आहे. ‘मला महिलांचं शरीर आवडतं. पण मला त्यांचं डोकं आवडत नाही.’ या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर खूप टीका देखील झाली आहे. आजही तो आपल्या वक्तव्यावर ठाम आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणाला आहे की, ‘डोक्याला कोणतंही जेंडर नसतं. म्हणजे महिलेला डोकं नसतं आणि पुरूषाला डोकं असतं. लैंगिक पैलू खूप विशिष्ट आणि ठराविक आहे. एका महिलेकडे एक अतिरीक्त वस्तू असते जी तिची कामुकता आहे आणि ज्याची मी प्रशंसा करतो. ‘पुढे राम गोपाल वर्मा म्हणाला की, Guns & Thighs या पुस्तकातही मी म्हटलंय मला महिलांच शरीर आवडतं पण मला त्यांचं डोकं आवडतं नाही.

तुम्ही महिलांबद्दल असा विचार का करता? असा सवाल जेव्हा राम गोपाल वर्मा यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, ‘मी आता माझं मत का बदलू? बदलण्यासाठी आता काहीच नाही. ‘पुढे ते असं देखील म्हणाले की, ‘मी कोणत्या नात्यात देखील नाही. भावनीक होत मी कुणातच अडकलो नाही. मी आता खूप व्यस्त आगे. ‘माझा लग्न या व्यवस्थेवरही विश्वास नसल्याचे रामगोपाल वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.