पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी ! मागील ६ दिवसांत घटले तब्बल एवढे अॅक्टिव्ह रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी ! मागील ६ दिवसांत घटले तब्बल एवढे अॅक्टिव्ह रुग्ण

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील ६ दिवसांत पुण्यात जवळपास ७ अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पुण्यात सलग सहाव्या दिवशी शहरात नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज (ता. २४) पुणे शहरात ३ हजार ९९१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात एकूण ७४ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १९ रुग्ण बाहेरचे आहेत. पुण्यात १८ एप्रिल रोजी पहिल्यांदा नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे पाहायला मिळाले होते. १८ एप्रिलपासून सातत्याने हा कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा अधिक आल्याने पुण्यातील परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याचे पाहायला मिळाले आहे. १८ एप्रिल रोजी पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६ हजार ६३६ एवढी होती. ती आज २४ एप्रिल रोजी कमी होऊन ४९ हजार ४७२ एवढी झाली आहे.

मागील सहा दिवसांपासून सातत्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पुणेकरांना दिलासा मिळत असून आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.