राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ६५ जणांना क्लीन चीट
बातमी महाराष्ट्र

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ६५ जणांना क्लीन चीट

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चिटस देण्यात आली आहे. यावर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईल, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वी एसआयटीने देखीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेच्या ७५ जणांना क्लीन चीट दिली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हसन मुश्रीफ म्हणाले की, मुळात महाराष्ट्र राज्य बँकेचा हा घोटाळा नव्हताच. मी बँकेच्या एकाही बैठकीला उपस्थित नव्हतो, तरीही चंद्रकांत पाटील यांनी माझं नाव घातलं. चंद्रकांत पाटील यांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर “ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी उगळण चांगलं नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय.

दरम्यान, राज्य सहकारी बँक कथित घोटाळा २५ हजार कोटी रुपयांचा होता. प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदिंच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्याच्या सहकार विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीचे गठन केले होते. या समितीने या प्रकरणाचा अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. या चौकशी समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, एसआयटीने या प्रकरणी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.