मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर ईडीने दोघांनाही अटक केली. तसंच अनिल देशमुख यांनाही समन्स बजावले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना न्यायालयाने १ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. काल झालेल्या छापेमारीनंतर ईडीने अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

पीएमएलए कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. त्यानंतर दोघांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोघांनाही १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.