देशात ५१ जणांना डेल्टा प्लसचा संसर्ग; २४ तासांत ४८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात ५१ जणांना डेल्टा प्लसचा संसर्ग; २४ तासांत ४८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाचा धोका टळलेला नसून देशभरात डेल्टा प्लसचे व्हेरिएंटच्या ४५ हजार चाचण्यांमधून ५१ बाधितांची नोंद १२ राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी २२ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ४८ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर १ हजार १८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी २१ जून रोजी ४२ हजार ६४० रुग्णांची नोंद झाली होती. तसेच, गेल्या २४ तासात ६४,८१८ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहे. त्यामुळे १७,३०३ सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनार गेल्या २४ तासात ६४ हजार ८१८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शुक्रवारी १,१८३ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत ३ कोटी १ लाख ८३ हजार १४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ९१ लाख ९३ हजार ८५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आपापर्यंत देशात ३ लाख ९४ हजार ४९३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ५ लाख ९५ हजार ५६५ सक्रिय रुग्ण आहेत.

देशातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण १.३१ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. देशात २ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत जगाच्या तिसऱ्या स्थानी आहे तर एकूण करोनाबाधितांच्या संख्येत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत त्यानंतर भारताचा क्रमांक आहे.