नवऱ्याने इच्छेविरुद्ध सेक्स केला तरी तो बलात्कार ठरत नाही – उच्च न्यायालय
देश बातमी

नवऱ्याने इच्छेविरुद्ध सेक्स केला तरी तो बलात्कार ठरत नाही – उच्च न्यायालय

नवी दिल्ली : छत्तीसगड उच्च न्यायालयाने नवऱ्याने बायकोवर केलेल्या बलात्कार प्रकरणातील खटल्यात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित पत्नीसोबत पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्यास बलात्कार होत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र पत्नीचं वय १८ वर्षाखाली असू नये, असं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. या प्रकरणात न्यायालयाने पतीला आरोपमुक्त केलं आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयातील न्यायधीश एन के चंद्रवंशी यांनी हा निकाल दिला आहे. दुसरीकडे पतीने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत.

छत्तीसगडमधील एका महिलेने ३७ वर्षीय पतीवर इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंडाप्रकरणी छळ केल्याचा आरोपही केला होता. दोघे २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. लग्नानंतर पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याचबरोब हुंड्यासाठी छळ केला, असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार ठरत नाही. पण पत्नीचं वय हे १८ पेक्षा कमी नसावं. त्यामुळे हा बलात्कार नाही. तक्रारकर्ती महिला आरोपीची पत्नी आहे. त्यामुळे हा बलात्कार नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. दुसरीकडे पत्नीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपही केला होता. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा निश्चित केला आहे. कोणत्याही प्रकारचा अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करणं हा गुन्हा आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे.