राहुल गांधींना करोनाची लागण; नरेंद्र मोदींनी केले ट्विट
देश बातमी

राहुल गांधींना करोनाची लागण; नरेंद्र मोदींनी केले ट्विट

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा, असे त्यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसत असून अनेक राजकीय नेत्यांनाही लागण होत आहे. नुकतंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, सपा नेते अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंर राहुल गांधी लवकर कोरोनावर मात करतील अशी आशा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे ट्विट केले आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा कहर वाढत असल्याने राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट करत ही माहिती दिली होती. कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा, असं सभा रद्द करत असतानाचा निर्णय जाहीर करताना त्यांनी म्हटले होते.