नव्या कोरोनाला रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये पुन्हा कडक लॉकडाउनची घोषणा
बातमी विदेश

नव्या कोरोनाला रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये पुन्हा कडक लॉकडाउनची घोषणा

ब्रिटन : कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या मध्यात हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनची सुरवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली. स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बेरिस जॉन्सन यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेले जवळपास २७ हजार लोक रुग्णालयात दाखल असून एप्रिलच्या पहिल्या महिन्यात करोनाची पहिली लाट आली होती त्याच्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे. गेल्या मंगळवारी २४ तासांत ८० हजार लोक करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

याबाबत बोलताना पंतप्रधान जॉन्सन म्हणाले की, ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृत्यूची संख्याही जास्त आहे. आधीच जवळपास चार कोटी जनतेला कडक निर्बंधांमध्ये रहावं लागत आहे. यासाठी करोनाच्या नव्या प्रकाराला जबाबदार ठरवण्यात आलं आहे. इतकेच नव्हे तर देशात अद्यापही अनेक ठिकाणी कडक निर्बंध असताना कोरोनाचा नवा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी आपण एकत्रितपणे अजून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन केला पाहिजे,” असं बेरिस जॉन्सन यांनी सांगितलं.