आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार – राजेश टोपे
बातमी मुंबई

आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार – राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर बनली असून ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यावरून आम्ही केंद्र सरकारच्या पायादेखील पडायला तयार आहोत, असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रेमडेसिव्हीर बाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘रेमडेसिव्हीर सात कंपन्या बनवतात, साधरण 36 हजार रेमडेसिव्हीर रोज मिळत असे पण आता केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती वाटायचं याचं नियंत्रण स्वत:कडे घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला केवळ 26 रेमडेसिव्हीरचा वाटा मिळतो आहे. 21 ते 30 एप्रिलपर्यंत अशाप्रकारे रेमडेसिव्हीर देण्याचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. या निर्णयामुळे राज्याला दररोज 10 हजार रेमडेसिव्हीरची कमतरता भासेल.’

दररोज 36 हजार मिळणारं रेमडेसिव्हीर येणाऱ्या एक दोन दिवसा 60 हजारांवर जावं आणि त्यानंतर 1 लाखांवर अशी आमची मागणी होती, असंही टोपे यावेळी म्हणाले. या निर्णयामुळे राज्य सरकारसमोरील आव्हानं वाढली आहेत आणि या आव्हानांना कसं तोंड द्यायचं याविषयी बैठक घेणार असल्याची प्रतिक्रिया टोपे यांनी दिली आहे. निर्यात करण्यासाठी देखील केंद्राची परवानगी आवश्यक आहे, शिवाय एक्सपोर्ट्सना देखील थेट विक्री कऱण्यास परवानगी नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनही रेमडेसिव्हीर मिळणंही ना च्या बरोबर आहे, असं टोपे म्हणाले. राजेश टोपे यांनी केंद्राला विनंती केली आहे की पीएओ स्तरावर रेमडेसिव्हीरच्या पेटंट कंपनीशी बोलून महाराष्ट्राचा आणि देशाचा हा प्रश्न मार्गी लावावा.