सुनील गायकवाड यांचा इंडियन स्टार्स अवार्डने सन्मान
बातमी महाराष्ट्र

सुनील गायकवाड यांचा इंडियन स्टार्स अवार्डने सन्मान

मुंबई – लातूरचे माजी खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना मानाचा असा इंडियन स्टार्स अवार्ड २०२१ हा मुंबई ग्लोबल न्यूज पेपर आयोजित पुरस्कार मिळाला आहे. नुकताच हा पुरस्कार सोहळा जूहू येथे पार पडला. हा पुरस्कार अभिनेता आणि गायक अरुण बक्षी यांच्या हस्ते देण्यात आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लातूरचे खासदार म्हणून काम करत असताना लातूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गायकवाड यांनी अनेक योजना राबविल्या. यामध्ये प्रामुख्याने रेल्वेने पाणी, रेल्वे बोगी कारखाना, अनेक नवीन रेल्वे सुरू केल्या. खास करून पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीसाठी कमी दरात स्पेशल ट्रेन सुरु केली. मुस्लिम समाजच्या इस्तेमासाठी गुलबर्गा औरंगाबाद विशेष ट्रेन सुरु केली. लातूरमध्ये सुपर स्पेशलीटी रुग्णालय सुरू केले. पासपोर्टसाठी पासपोर्ट कार्यालय सुरू केले.

त्याचबरोबर, लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण केले. मेडिकल आणि इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी लातूर आणि नांदेड येथे नीटचे परीक्षा केंद्र सुरू केले. तसेच, लातूर लोकसभा मतदार संघातील कामांबरोबरच देश पातळीवरील अनेक विषय संसदेत मांडले. अनेक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण भाषने संसदेत केले. उच्च शिक्षित खासदार म्हणून १६व्या लोकसभेत संसदरत्न पुरस्काराने ही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या सर्वव्यापी कामामुळे मुंबईमध्ये इंडियन स्टार्स अवॉर्ड २०२१ने गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कार्यक्रमाचे संयोजक राजकुमार तिवारी आणि बॉलिवूडचे क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.