दोन मंत्र्यांना मिळणार नाही मंत्रालयात जागा; हलवावे लागणार कार्यालय समोरच्या इमारतीत
बातमी मुंबई

दोन मंत्र्यांना मिळणार नाही मंत्रालयात जागा; हलवावे लागणार कार्यालय समोरच्या इमारतीत

मुंबई : मंत्रालयात जागा नसल्याने राज्य मंत्रिमंडळातील दोन राज्यमंत्र्यांना मंत्रालयात जागा मिळणार नाही. त्यामुळे त्यांना समोरच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. आता कोणत्या दोन मंत्र्यांना आपले कार्यालय समोरील इमारतीत हलवावे लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंत्रालयात आग लागल्यानंतर जीटी रुग्णालयाजवळच्या इमारतीत हलविण्यात आलेली वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा यांची कार्यालयेही आता नवीन प्रशासकीय इमारतीत हलवण्यात आली आहेत, तर या इमारतीत असलेली लोकायुक्त कार्यालय, राज्य माहिती अधिकार कार्यालय यांना एमएमआरडीएच्या वडाळा येथील इमारतीत जागा देण्यात आली आहे. राज्य सरकारची सर्व प्रशासकीय कार्यालये यापूर्वी मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीत होती.

जून २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मंत्रालयातचे नूतनीकरण करण्यात आले. परंतु, अद्याप ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य आणि पाणीपुरवठा या हे विभाग मंत्रालय इमारतीबाहेरच कार्यरत आहेत. सदर विभाग हे ग्रामीण भागाशी निगडीत असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री या स्तरावर अनेक बैठक होत असतात. परंतु, या अधिकाऱ्यांचा बराच वेळ हा बैठकांना येण्या-जाण्यात जातो. तसेच, कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या कामाचा व्याप वाढला आहे. सदर कामांसाठी तातडीने निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे या विभागांना आता नवीन प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.