धक्कादायक ! भोपाळमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने १० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! भोपाळमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने १० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी गोंधळ उडत असल्याचे समोर येत आहे. शहडोल येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असतानाच आश्चर्याची बाब म्हणजे असाच प्रकार भोपाळमधील एका रुग्णालयातही अशीच घटना घडल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमधील पिपल्स हॉस्पीटल नावाच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. रुग्णालय प्रशासनाने हे वृत्त फेटाळलं आहे. सकाळी रुग्णालयातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याला नक्कीच फटका बसला होता मात्र त्यामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा रात्रभर पुरेसा असला तरी सकाळी तो संपतो. अशाच प्रकारे सोमवारी सकाळी ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने हे मृत्यू प्रकृती खालावल्याने झाल्याचे सांगण्यात आला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत असतो अशी सारवासारवही रुग्णालयाने केल्याचे वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशातीलच शहडोलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाच्या १२ रुग्णांना प्राण गमावावा लागला होता. ही घटना शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये घडली होती.