धक्कादायक ! केरळमध्ये प्रवासीट्रेनमध्ये सापडला स्फोटकांचा साठा;  एका महिलेला अटक
देश बातमी

धक्कादायक ! केरळमध्ये प्रवासीट्रेनमध्ये सापडला स्फोटकांचा साठा; एका महिलेला अटक

केरळमध्ये चेन्नई-मंगलपुरम प्रवासी एक्स्प्रेसमध्ये स्फोटकांचा साठा सापडला आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रमानी असं ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. रेल्वेच्या ज्या सीटखाली ही स्फोटक मिळाली, तिथे ही महिला बसली होती. ही महिला चेन्नई ते थालास्सेरी असा प्रवास करत होती. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या महिलेने स्फोटक आणली का? याचा तपास पोलिस करत आहे. ही महिला मूळची तामिळनाडूची आहे. चौकशी केली असता विहिर खोदण्यासाठी आपण ही स्फोटकं नेत होतं असा दावा तिने केला आहे. रेल्वे पोलीस सध्या याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला आहे. त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या 25 कांड्या सापडल्या असून याप्रकरणी नागपूर कनेक्शन समोर आलं आहे. या कांड्यावर नागपूरच्या कंपनीचं नाव आहे.

जिलेटिन हा विस्फोटक असून ते लिक्विड फॉर्ममध्ये असते. भारतात हे विस्फोटक डोंगर फोडण्यासाठी किंवा खाणकामामध्ये वापरण्यात येते. भारतात याच्या वापरासाठी परवान्याची गरज आहे. परंतु याचा वापरासाठी सरकारने नियमावली केली आहे. जिलेटिनचा वापर नक्षली संघटनेबरोबरच आतंकवादी संघटना देखील करतात. भूसुरुंग घडवून आणण्यासाठी एका डब्यात जिलेटिनच्या कांड्या,युरिया, रॉकेल, खिळे, चर्रे, फटाके, दारुगोळा ठेवला जातो. 25 जिलेटिन कांड्यामध्ये 100 मीटरपर्यंत स्फोट घडवून आणण्याची क्षमता आहे.