शेतकरी आंदोलन कधी संपणार? टिकैत यांची मोठी घोषणा
देश बातमी

शेतकरी आंदोलन कधी संपणार? टिकैत यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : दिल्लीत चालू असलेले शेतकरी आंदोलन कधी संपणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला असला तरी अशात भारतीय किसान युनिअनचे प्रमुख राकेश टिकैत यांनी मोठी घोषणा केली आहे. राकेश टिकैत यांनी जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही असा नारा दिला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असं मोठं विधान केलं आहे. हे आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही. हे आंदोलन लवकर संपणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचं टिकैत यांनी जाहीर केलेलं आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जामची घोषणादेखील केली आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर येथे भेट घेतल्यानंत राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या भेटीसंबंधी बोलताना राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे की, जर विरोधक येऊन आम्हाला पाठिंबा देत असतील तर त्यामध्ये काहीच समस्या नाही. पण त्यांनी याचं राजकारण करु नये. जर कोणी नेते भेटायला येत असतील तर आम्ही काहीच करु शकत नाही.