जयंत पाटील यांची अचानक बिघडली तब्येत; रुग्णालयात दाखल
बातमी महाराष्ट्र

जयंत पाटील यांची अचानक बिघडली तब्येत; रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रूग्णालयाकडे रवाना झाले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत राजेश टोपे यांच्यासह जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील व अन्य काही मंत्री देखील असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

जयंत पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाहणी केलेली आहे.