इशान किशन : पदार्पणाच्या सामन्यात असा विक्रम करणारा पहिला भारतीय
क्रीडा

इशान किशन : पदार्पणाच्या सामन्यात असा विक्रम करणारा पहिला भारतीय

अहमदाबाद : पदार्पणाच्या टी-२० सामन्यामध्ये अर्धशतक करणारा भारतीय सलामीवीर इशान किशन दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी २०११ साली अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात ६१ धावा केल्या होत्या. या शिवाय इशानने टी-२०च्या पदार्पणात चार षटकार मारले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यात इशान किशनला सलामीवीर म्हणून संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले. के एल राहुल आणि इशान किशन यांनी भारतीय डावाची सुरूवात केली. पहिल्या ओव्हरमध्येच राहुल शून्यावर बाद झाल्याने टीम इंडियाला मोठा झटका बसला. पण त्यानंतर इशान किशन आणि विराट कोहली यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी केली.

इशानने पदार्पणाच्या सामन्यात ५ चौकार आणि ४ षटकारांसह ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १७५ इतका होता. पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये इशानने अर्धशतक झळकावत मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला.